प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
(PMAY-G)
सन 2017-17 पासून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण राबविण्यात येत आहे. सर्वांसाठी घरे अंतर्गत ग्रामीण भागातील बेघरांना घरे उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
लाभार्थी निवड प्रक्रिया
● सदरील योजने अंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
२. प्राधान्य क्रम यादी बेघर, १ खोली लाभार्थी, २ खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे. प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकषावरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देणेत यावेत.
● १६ ते ५९ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब
● महिला कुटुंबप्रमुख व १६ ते ५९ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब
● २५ वर्षावरील अशिक्षित / निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब, अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही.
● भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे.
● सदरील गुणांकनाचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशाप्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करणेत येईल.
३. जर निकषाआधारित गुणसंख्या समसमान असेल तर ग्रामसभा खालील मुद्यांच्या आधारे प्राधान्य देतील.
४. ग्रामसभा एखाद्या कुटुंबास घराची तातडीची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे योग्य कारणमीमांसा नोंदून प्राधान्य क्रमात बदल करू शकते.
५. ज्या कुटुंबांना राज्य किंवा केंद्र सरकारचे गृह निर्माण अर्थसाहाय्य प्राप्त झाले असेल, ते कुटुंब आपोआपच या योजनेसाठी अपात्र होईल. या कारणाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी कुटुंबांची नावे यादीतून काढण्यासाठी सत्यपडताळणी करून ग्रामसभेची मान्यता लागेल.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची ठळक वैशिष्ट्ये
३. सदर योजने अंतर्गत लाभार्थ्याला २५ चौ.मी. क्षेत्रफळाचे घरकुल बांधणे गरजेचे आहे. यात आरोग्यदायी स्वयंपाक गृह असणे गरजेचे आहे.
४. लाभार्थ्यांची इच्छा असल्यास त्याला या योजने अंतर्गत बँकेकडून रु. ७०,०००/- इतके कर्ज प्राप्त होऊ शकते.
५. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत प्राप्त होणान्या उद्दिष्टाच्या ६०% उद्दिष्ट हे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या संवर्गास आणि १५% उद्दिष्ट अल्पसंख्याक प्रवर्गास देणे बंधनकारक आहे. तसेच ३% उद्दिष्ट दिव्यांग व्यक्तींसाठी देणे बंधनकारक आहे.
६. ग्रामीण भागातील घरकुल बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी गवंडी प्रशिक्षण राबविण्यात येते.
७. लाभार्थ्यांना ते राहत असलेल्या ठिकाणी उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून तसेच त्यांनी निवडलेल्या गृहबांधणी आराखड्याचा वापर करून घर बांधता येते.
सदर योजना आवास सॉफ्ट (AwaasSoft) द्वारे लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन (Registration) करून आणि पी. एफ. एम. एस (PFMS) प्रणालीद्वारे लाभाथ्र्यांच्या खात्यामध्ये सरळरित्या निधी वितरीत करून राबविण्यात येत आहे. लाभार्थ्याने बांधलेल्या घराचे फोटो, निधी वितरणाचे ट्रैकिंग ( Tracking) करणे या सर्व बाबी आवास सॉफ्ट (Awaas Soft) वर उपलब्ध आहेत. त्यामुळे सदर योजनेंतर्गत अंमलबजावणीमध्ये पारदर्शकपणा आलेला आहे.
0 Comments