राज्यातील कातकरी, माडिया गोंड, कोलाम या जमाती आदिम जमाती (Particularly Vulnerable Tribes ) म्हणून केंद्र शासनाने अधिसूचित केल्या आहेत. या जमाती अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात वस्ती करून रहातात. त्यामुळे या जमातींचा निवडून आलेल्या प्रशिक्षण संदर्भ साहित्य
निवासाचा प्रश्न सोडविणेस प्राधान्य देऊन आदिवासी विकास विभागामार्फत 'आदिम जमातीचा विकास' योजनेंतर्गत घरकुल योजना राबविणेत येते.
आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. आदिम-२०१५/प्र.क्र.८९/ का-१९, दि. ३१ मार्च २०१६ अन्वये सदर योजनेची अंमलबजावणी राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृहनिर्माण मार्फत करणेत येत आहे.
आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. आदिम- २०१७/प्र.क्र.१३/का-१९, दि. ७ फेब्रुवारी, २०१७ अन्वये आदिम जमाती विकास कार्यक्रमाखाली मंजूर केलेली घरकुले शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या निश्चित केलेल्या निकषानुसार बांधण्यात यावीत.
अधिक माहितीसाठी- पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा.
0 Comments