{ads}

6/recent/ticker-posts

ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलींसाठी अस्मिता योजना

ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन
मुलींसाठी अस्मिता योजना

(संदर्भ : ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक क्र. अस्मिता २०१८ / प्र.क्र.३३ / योजना-३ दिनांक १ मार्च २०१८)


१) योजनेचा उद्देश
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन (Sanitary Napkin) व वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणीव जागृती निर्माण करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे.


२) लाभार्थी
● ग्रामीण भागातील महिला
● जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वर्षे वयोगटातील मुली


3) अंमलबजावणी
● जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वर्षे वयोगटातील मुलींसाठी ही योजना प्राथमिक शिक्षण विभागाच्या (जिल्हा परिषद) मदतीने राबविण्यात येते.
● ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना उमेद पुरस्कृत महिला स्वयंसाहाय्यता बचत गट यांचेमार्फत राबविण्यात येते.


4) गटाची नोंदणी प्रक्रिया
● सर्वप्रथम गटांनी नोंदणीसाठी अस्मिता मोबाइल ॲप डाउनलोड करावे.
● अस्मिता ॲपद्वारे स्वयंसाहाय्यता समूह / बचत गट यांनी गटाचा एन आय सी कोड (NIC code ) वापरून नोंदणी करावी.
● नोंदणी अगोदर स्वयंसाहाय्यता समूहाने मोबाईल नंबर अद्ययावत करावा. जेणेकरून नोंदणीसाठी आवश्यक असलेला ओ.टी. पी. (OTP) मोबाईलवर येईल व नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.


५) जिल्हा परिषद शाळेतील किशोरवयीन मुलींची नोंदणी प्रक्रिया
● जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुलींच्या यादीची प्रमाणित प्रत मुख्याध्यापक यांनी ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रात (ASSK) जमा करावे.
● प्रत्येक किशोरवयीन मुलीची अस्मिता योजनेत नोंदणी अद्ययावत करावी. नोंदणी झालेल्या मुलींना अस्मिता कार्ड देण्यात येईल.


६) सॅनिटरी नॅपकिनची किंमत
● जिल्हा परिषद शाळेतील मुलींना ८ पॅडचे पॅकेट रु. ५ या अनुदानित किमतीत देण्यात येईल.
● ग्रामीण भागातील महिलांना २४० मोमी पॅडचे पॅकेट चोवीस रुपये (रु.24/-) व २८० मीमी पॅडचे पॅकेट रुपये (रु.29/-) एकोणतीस रुपये दराने विक्री करण्यात येईल.


Post a Comment

0 Comments