{ads}

6/recent/ticker-posts

पर्यावरण स्मार्ट ग्राम योजना

पर्यावरण स्मार्ट ग्राम योजना

पर्यावरण स्मार्ट ग्राम योजना

संदर्भ:

१) ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. स्माग्रायो-२०१५/ प्र.क्र.151-अ / योजना-१ दि. २१ नोव्हेंबर २०१६

२) ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. स्माग्रायो-२०१५/प्र.क्र.151 अ / योजना-११ दि. 16/04/2018


● राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून समृद्ध व संपन्न गावाची निर्मिती करण्याकरिता ही योजना राबविली जाते.

● उद्दिष्ट साध्य केलेल्या ग्रामपंचायतीला निधीच्या स्वरूपात पुरस्कार दिला जातो.

● या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीची निवड करण्याकरिता खालील निकष व गुणांकनाचा विचार केला जातो.

१. स्वच्छता - २५. गुण:

2. प्रशासन - 25 गुण

3. बंधन - 20 गुण

4. अपारंपरिक उर्जा व पर्यावरण - 20 गुण

5. पारदर्शकता व तंत्रज्ञान - 15 गुण


● प्रत्येक तालुक्यातून एक गाव स्मार्टग्राम म्हणून निवड झालेनंतर रु. १०:०० लाख निधी स्वरूपात पुरस्कार दिला जातो.

●  सर्व तालुक्याची स्मार्ट ग्राम निवड झाल्यानंतर जिल्ह्यातून एका ग्रामपंचायतीची जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात येते व त्यास रु. ४० लाख निधी स्वरूपात पुरस्कार दिला जातो.

● पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना जिल्हा स्तरावर मा. पालकमंत्री व सर्व अधिकारी यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येतो.

● स्मार्ट ग्राम पुरस्कार निवडीसाठी तालुकास्तरावरील तालुका तपासणी समिती पुढील प्रमाणे आहे.


  • गटविकास अधिकारी - समिती अध्यक्ष
  • विस्तार अधिकारी (आरोग्य) - सदस्य
  • विस्तार अधिकारी (कृषी) - सदस्य
  • कनिष्ठ अभियंता (पाणीपुरवठा) - सदस्य
  • साहाय्यक लेखा अधिकारी - सदस्य
  • तालुका विस्तार अधिकारी - सदस्य सचिव


पुरस्कार निवडीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा तपासणी समिती तथा स्थानिक देखरेख समिती पुढील प्रमाणे आहे.

  • मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. - समिती अध्यक्ष
  • जिल्हा आरोग्य अधिकारी - सदस्य
  • जिल्हा कृषी विकास अधिकारी - सदस्य
  • कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) - सदस्य
  • कार्यकारी अभियंता (बांधकाम) - सदस्य
  • मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी - सदस्य
  • उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) - सदस्य सचिव


●  स्मार्ट ग्राम पुरस्काराच्या निधीतून खालील नाविन्यपूर्ण कामे करता येतात.

१. अपारंपरिक ऊर्जा संबंधी अभिनव प्रकल्प

३. महिला सक्षमीकरण आणि मुलांना अनुकूल प्रकल्प

४. स्वच्छ पाणी वितरण

5. औद्योगीक माहिती प्रणाली बसविणे

६. आंतरराष्ट्रीय मानदंड, मार्गदर्शक तत्त्वे, संकलन तपासणी सूची तयार करून दर्जा वाढविण्यासाठी प्रकल्प दाखविणे.

Post a Comment

0 Comments