महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे महाराष्ट्र शासनाचे अधिपत्याखाली असलेले मंडळ आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ नुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील कामगारांच्या सर्वागिण विकासासाठी मंडळ काम करते. अधिनियमाच्या कलम ६ ब ब नुसार कामगार, मालक, शासन अशी त्रिपक्षीय वर्गणी (MLWF महाराष्ट्र लेबर वेल्फेअर फंड) दर ६ महिन्यातून (जून व डिसेंबर) मंडळाला मिळते. या निधीतून कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ महाराष्ट्र राज्यातील सर्व आस्थापनांना लागू आहे. यात फॅक्ट्री अॅक्ट १९४८ अंतर्गत येणारे सर्व कारखाने, बॉम्बे शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट १९४८ अंतर्गत येणारी सर्व दुकाने व आस्थापना (ज्यामध्ये किमान ५. कामगार असावेत) आणि द मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स अॅक्ट १९६१ अंतर्गत नोंदित आस्थापनांचा समावेश होतो. यात महाराष्ट्रातील सर्व बँका, दुकाने, कंपन्या, कारखाने, वर्कशॉप, हॉटेल्स, उपहारगृह, हॉस्पिटल्स, ट्रान्सपोर्ट/ टुरीस्ट कंपनी, केंद्र व राज्य शासनाच्या अंगीकृत असलेले सर्व उद्योग / आस्थापना यात काम करणारे नियमीत, हंगामी, कंत्राटी कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार/ कर्मचारी यांना मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येतो.
कामगार कल्याण निधी -
अधिनियमाच्या कलम ३ नुसार कल्याणकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यात पुढील बाबींचा समावेश होतो.
१) कर्मचाऱ्यांकडून वसूल केलेल्या दंडाच्या रकमा.
८) राज्य शासनाने दिलेले कोणतेही कर्ज, सहायक अनुदान किंवा अर्थसहाय्य.
अधिनियम लागू असलेल्या आस्थापना -
वरील अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या महाराष्ट्र राज्यात कार्यरत आस्थापना, कंपन्या, कारखाने, दुकाने, बँका, हॉस्पिटल्स, टूर्स आणि ट्रव्हल्स कंपन्या, विविध कंत्राटदार, ठेकेदार आदी सर्व वाणिज्य / व्यावसायिक संस्थांना सदर अधिनियम लागू असून मंडळाकडे महाराष्ट्र कामगार कल्याण निधी भरणा करणे कायद्याने बंधनकारक आहे.
त्रिपक्षीय अंशदान दर -
अधिनियमाच्या कलम ६ ब ब नुसार मंडळाकडे दर सहा महिन्यात जून आणि डिसेंबरमध्ये खालीलप्रमाणे अंशदान मंडळाकडे भरणा करणे कायद्याने बंधनकारक आहे.
मंडळाचे ब्रीद
शिस्त, सेवा, सुधार, समृद्धी
मंडळाचे ध्येय
महाराष्ट्रातील नोंदणीकृत कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे दर्जेदार कल्याणकारी योजना, कार्यक्रम व सुविधा पुरवून जीवनमान उंचावणे. त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व मानसिक उन्नती घडविणे.
मंडळाचे कार्य
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियमाच्या कलम ७ (२) अन्वये कामगार कल्याण कार्याची चौकट ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार सदर निधीचा विनियोग केला जातो.
१) वाचनालये व ग्रंथालये यांचा समावेश असणारी सामुदायिक आणि सामाजिक शिक्षण केंद्राची सोय.
२) शिशु मंदिरे, शिशु संगोपनालये, अभ्यासिका इत्यादी द्वारे सामुदायिक गरजांकरिता तरतूद.
३) खेळ व खेळ स्पर्धा ( शरीर संवर्धन )
४) सहली, सफरी इत्यादी
५) मनोरंजनात्मक व इतर करमणुकीचे कार्यक्रम
६) कामगार वर्गातील स्त्रियांसाठी व बेरोजगारांसाठी शिबीर व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र.
७) सामाजिक स्वरूपाचे सामुदायिक कार्यक्रम.
८) कामगारांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाच्या दृष्टीने उपयुक्त असे कार्यक्रम.
मंडळाच्या विविध कल्याणकारी योजना पुढीलप्रमाणे आहेत:
- सर्वसाधारण शिष्यवृत्ती – इ.१० वी पासून पुढील पदवी, पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी (तांत्रिक/वैद्यकीय/अभियांत्रिकी इ.) रु.२०००/- ते रु.५०००/- पर्यंतची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. मागील वर्षी किमान ६० टक्के गुण आवश्यक. तसेच MPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण कामगार पाल्यांना रु.५,०००/- व UPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण कामगार पाल्यांना रु.८,०००/- दिले जाते. Ph.D. अभ्यासक्रमासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना रु.५०००/- अर्थसहाय्य एकदाच दिले जाते.
- परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती – परदेशात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या कामगार पाल्यास रु.५०,०००/- वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून २ वर्ष शैक्षणिक खंड ग्राह्य असेल.
- क्रीडा शिष्यवृत्ती – कामगार / कामगार कुटुंबियांनी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविल्यास खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.
- पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य – इयत्ता १० वी पासून पुढील शिक्षणासाठी कामगार पाल्यांना क्रमिक पाठ्यपुस्तक खरेदी रकमेच्या ५० टक्के रक्कम अर्थसहाय्य दिले जाते.
- MS-CIT अर्थसहाय्य – MS-CIT परीक्षेत ६० टक्के पेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झाल्यास शासनमान्य शुल्काच्या ५० टक्के रक्कम कामगार / कामगार पाल्यांना दिली जाते.
- गुणवंत विद्यार्थी गौरव – इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत सर्वाधिक सहा (किमान ९० टक्क्यांपेक्षा अधिक) गुण प्राप्त करणाऱ्या कामगार पाल्यांस रु.,५०००/- देण्याची योजना आहे. प्रत्येक गट कार्यालय स्तरावर इयत्ता दहावीचे ३ व इयत्ता बारावीचे ३ अशा एकूण ६ गुणवंतांचा गौरव केला जातो.
- अपंग कामगार पाल्यांना विशेष सवलत – मंडळाच्या आर्थिक लाभाच्या सर्व योजनांमध्ये शासन धोरणानुसार ३ टक्के प्राधान्य दिले जाते. शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी टक्केवारीची अट शिथिल केली आहे. पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना व MS-CIT अर्थसहाय्य योजनेत १०० टक्के अर्थसहाय्य दिले जाते.
- इंग्रजीसह विदेशी भाषा संभाषण प्रशिक्षण – किमान इ.१० वी पास असलेल्या कामगार व कामगार पाल्यांना इंग्रजी, फ्रेंच, जॅपनीज आदी रोजगाराभिमुख भाषांचे संबाषण व लेखनाचे ज्ञान व्हावे, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रशिक्षण कालावधी ३ ते ६ महिने आहे. नाममात्र रु.१००/- प्रतिमाह शुल्क आकारले जाते.
- वाहन चालक प्रशिक्षण – चार चाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण कामगार व त्यांच्या कुटुंबियांना दिले जाते. वयोमर्यादा किमान १८ ते कमाल ४० वर्ष आहे. किमान ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कामगाराचे वार्षिक उत्पन्न रु. ५ लाखापेक्षा जास्त नसावे.
- साहित्य प्रकाशन अनुदान– कामगार लेखकाने स्वःलिखित साहित्य (कथा, कादंबरी, नाटक, काव्यसंग्रह आदी) प्रकाशित केल्यास रु.१०,०००/- पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते.
- शिवण मशीन अनुदान योजना- मंडळाच्या तसेच सरकारमान्य - शिवणवर्गाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण कामगार किंवा कामगार कुटुंबिय महिलांना या योजनेअंतर्गत शिवण मशीन खरेदीसाठी अनुदान दिले जाते. शिवणयंत्राच्या ९० टक्के रक्कम मंडळाकडून अर्थसहाय्य दिले जाते. उर्वरीत रक्कम लाभार्थीस भरावी लागते.
• गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य- कामगार / कामगार कुटुंबियांना कर्करोग, हृदयरोग, एड्स, क्षयरोग आदी दुर्धर आजाराच्या औषधोपचारासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाते.
• प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना- कामगार कल्याण निधी भरणाऱ्या - कामगार / कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करण्यात येत आहे. विमा हप्त्याची प्रतिपुर्ती मंडळाकडून करण्यात येते. केंद्रशासनाच्या योजनेनुसार कामगारांना लाभ मिळेल.
• आत्महत्या केलेल्या कामगारांच्या कुटुंबियास अर्थसहाय्य - उद्योग /आस्थापना बंद पडून आर्थिक दुरावस्थेमुळे आत्महत्या केलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना रु.१ लाख अर्थसहाय्य देण्याची योजना आहे
• लांब पल्ल्याची सहल - कामगार व कामगार कुटुंबियांसाठी मंडळातर्फे वर्षातून एकदा सहलीचे आयोजन केले जाते. एकापेक्षा जास्त आस्थापनांतील किमान २५ ते कमाल ४० कामगार व कामगार कुटुंबियांचा सहलीत सहभाग असावा. प्रती लाभार्थी प्रवास खर्च व दैनिक भत्त्यासाठी रु. ३२०/- अर्थसहाय्य दिले जाते.
स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना-
कामगार व कामगार कुटुंबियांसाठी UPSC, MPSC तसेच बँक, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, तलाठी, पोलीस, लिपिक, आदी स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन केले जाते. सदर अभ्यासक्रम २ ते ८ महिने कालावधीचे आहेत. निवड चाचणीद्वारे प्रशिक्षणार्थी निवडले जातील. प्रशिक्षणार्थीकडून नाममात्र रु. २५०/- ते रु.५००/- प्रवेश शुल्क घेतले जाते. प्रशिक्षणात कोचिंग, स्टडी मटेरिअल, टेस्ट सिरिज यांचा समावेश आहे.
दिव्यांग कामगार पाल्यांना विशेष सवलत -
आर्थिक लाभाच्या योजनांमध्ये शासन धोरणानुसार प्राधान्य दिले जाते. शिष्यवृत्तीसाठी टक्केवारीची अट शिथिल केली आहे. पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य व MS-CIT अर्थसहाय्य योजनेत १०० टक्के अर्थसहाय्य दिले जाते.)
पुरस्कार
विश्वकर्मा आदर्श कामगार कल्याण पुरस्कार-
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या कामगारास सदर पुरस्कार देऊन गौरविले जाते. कामगाराची एक किंवा विविध आस्थापनांत मिळून एकूण सेवा किमान ५ वर्षे असावी. रु. १५ हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कामगार भूषण पुरस्कार विश्वकर्मा आदर्श कामगार कल्याण पुरस्कार- (पूर्वीचे नाव गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार) मिळाल्याच्या १० वर्षानंतर सदर पुरस्कारासाठी अर्ज करता येतो. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात भरीव कामगिरी अपेक्षित आहे. रु. २५ हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार-
कामगारांच्या कल्याणासाठी किमान २५ वर्षे कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था, संघटना यांना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी अर्ज करायला लावणे उचित नसल्याने समाजातील मान्यवर, उद्योग संस्था, संघटना यांच्याकडून विहित नमुन्यात माहिती मागवली जाते. प्राप्त माहितीच्या आधारे गुणवत्तेच्या आधारे व्यक्ती / संस्था यांची निवड केली जाते. व्यक्तीचे वय ५० वर्षांपेक्षा कमी नसावे. संस्थेची नोंदणी किमान २५ वर्षापुर्वी झालेली असावी. रु.५० हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
उपक्रम
शिशुमंदिर, पाळणाघर, शिवणवर्ग (सरकारमान्य / मंडळाचा), हस्तकला वर्ग, फॅशन डिझायनिंग वर्ग, ग्रंथपालन प्रमाणपत्र शिक्षण अभ्यासक्रम, संगणक प्रशिक्षण वर्ग, वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, व्यायामशाळा, कराटे प्रशिक्षण, योगावर्ग, धनुर्विद्या (आर्चरी), टेबल टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, जलतरण तलाव, कराटे प्रशिक्षण वर्ग, संगीत वर्ग, नृत्य वर्ग, चित्रकला वर्ग, ब्युटीपार्लर वर्ग.
(स्थानिक कामगारांची मागणी, जागेची व तज्ज्ञांची उपलब्धता यानुसार विविध उपक्रम केंद्र स्तरावर राबविले जातात.)
कार्यक्रम
कामगार नाट्य स्पर्धा, महिला / बाल नाट्य स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा / भजन स्पर्धा, समगीत / स्फुर्तीगीत स्पर्धा, कामगार साहित्य संमेलन, कबड्डी स्पर्धा, कामगार केसरी / कुमार केसरी कुस्ती स्पर्धा, कामगार श्री – शरीर सौष्ठव स्पर्धा, कामगार नाट्यकर्मींचा सत्कार, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्याचा सत्कार, शालांत परीक्षा मार्गदर्शन / कारकीर्द गाईडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, रोजगार मेळावा, स्वयंरोजगार / पुरक उद्योग / बचतगट प्रशिक्षण शिबिर, क्रीडा प्रशिक्षण शिबिर, नाट्य प्रशिक्षण शिबिर, दूर पल्याच्या सहली.
0 Comments