{ads}

6/recent/ticker-posts

जलयुक्त शिवार अभियानातील कामे गुणवत्तापूर्ण करावीत

 

जलयुक्त शिवार अभियानातील कामे गुणवत्तापूर्ण करावीत – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई : राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आता ५ हजार ६७१ गावांची निवड करण्यात आली आहे. कामांसाठी आराखडे तयार करण्यात आले आहेत. ती कामे लवकरात लवकर  सुरू करून गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्यात यावीत, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.

जलयुक्त शिवार अभियानातील कामे गुणवत्तापूर्ण करावीत

मंत्रालय येथे आयोजित मृद व जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दूरचित्र संवाद प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हा जलसंधारण अधिकारी उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियानातील कामे गुणवत्तापूर्ण करावीत

मंत्री श्री.राठोड यांनी राज्यातील जलयुक्त शिवार अभियान २.०, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना २.०, ० ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या योजनांचे सर्वेक्षण, लहान पाटबंधारे योजना, ० ते ६०० हेक्टर सिंचन क्षमता (नवीन व दुरुस्ती) व मालगुजारी तलाव मजबुतीकरण या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. विविध कामांचे प्रस्ताव प्रलंबित असतील तर ते सादर करण्यात यावेत, अशा सूचना मंत्री श्री राठोड यांनी यावेळी दिल्या.


Post a Comment

0 Comments